महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शरद पवारांनी विचारपूर्वक माझ्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली' - Home Minister Anil Deshmukh

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारपूर्वकच गृहमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीतील सर्व नेते सहमत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

Home Minister Anil Deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख

By

Published : Jan 6, 2020, 5:24 PM IST

Updated : Jan 6, 2020, 7:46 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विचारपूर्वकच गृहमंत्रीपदाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादीतील सर्व नेते सहमत असल्याचे वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

शरद पवार यांनी मला गृहमंत्री देऊन केलेला प्रयोग नक्की यशस्वी होईल, असेही अनिल देशमुख म्हणाले. अनिल देशमुख जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. मात्र, पवारांच्या या निर्णयावरुन नाराजी नाट्य रंगत असल्याची चर्चा आहे. यावर अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले. शरद पवार यांनी विचारपूर्वकच माझ्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी दिली असून, या निर्णयावर पक्षातील सर्व नेते सहमत असल्याचे ते म्हणाले.

'विचारपूर्वक शरद पवारांनी माझ्यावर गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली'

नागपूरसह राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लवकरच पोलीस दलातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे देशमुख म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यावेळी गृहमंत्री पदाचा कार्यभार असल्याने ते कदाचित या विभागाकडे पूर्ण लक्ष देऊ शकले नसतील. पण मी फुल टाईम गृहमंत्री आहे. मी नागपूरसह राज्यातील प्रत्येक शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न कारणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

नागपूर शहर हे क्राईम कॅपीटल असल्याचा प्रचार नेहमीच होतो. कारण इथे घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांचा आवाज नेहमीच मुंबई, दिल्लीपर्यंत पोहोचत राहिला आहे. त्यामुळेच नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आवाहन पोलीस विभागावर राहिलेले आहे. आता गृहमंत्रीच नागपूरचे असल्याने पोलिसांची जबाबदारी वाढल्याचे देशमुख म्हणाले.

Last Updated : Jan 6, 2020, 7:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details