नागपूर -जिल्ह्यात दोन नगरपंचायतीचे निकाल आज आले असून यामध्ये हिंगणा नगरपंचायती विजय ( Hingna Nagar Panchayat Election ) मिळवण्यात यश आले. तेही कुही नगरपंचायतवर काँग्रेस-राष्ट्रवादीला बहुमत ( Kuhi Nagar Panchayat Election Results ) मिळाले आहे. हिंगणा विधानसभा मतदारसंघात येत असलेली हिंगणा नगरपंचायत भाजपची सत्ता होती त्यांनी यंदाच्या सार्वत्रिक निवडणूक विजय नगरपंचायत काबीज केली आहे. जनतेने हिंगणा नगर पंचायतीत केलेल्या विकासकांमुळे जनतेने कौल दिल्याचे भाजपचे आमदार समीर मेघे यांनी सांगितले आहे.
हिंगणा नगर परिषदेत भाजपला 9 जागा -
या हिंगणा मतदार संघात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपने 9 जागेवर विजय मिळवला. यात 5 जागेवर राष्ट्रवादीने जिंकल्या असून 2 जागा अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. पण राज्यात सत्ता असलेल्या शिवसेनेनेही एक जागा विजय मिळवण्यात यश आले आहे. लोकांना विकासकामे पाहिजे असतात. यात विकासकामे असो की इतर कामे असो यामुळेच हा विजय मिळाल्याचे आमदार समीर मेघे यांनी सांगितले.
कुहीमध्ये काँग्रेसला 8 जागा -
काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचा मतदार संघातील कुही नगर पंचायतचा निकाल आला आहे. याठिकाणी कुही नगर पंचायतमध्ये मागीलवेळी काँग्रेसकडे 8 जागा होत्या. आज आलेल्या निकालात काँग्रेसने पुन्हा 8 जागा कायम ठेवल्या आहेत. भाजपकडे पाच जागा असताना एक जागा कमी होऊन 4 जागेवर विजय मिळवला आहेत. राष्ट्रवादीने मात्र मुसंडी मारत 1 जागेवरून वाढ होऊन 3 जागा अधिकच्या मिळवल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
- आज आलेले निकाल...