महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"हिंगणघाट पीडितेच्या डोळ्यांची सूज कमी मात्र श्वसन यंत्रणेत बिघाड होण्याची शक्यता" - हिंगणघाट पीडिता

हिंगणघाट पीडितेच्या शरिरातील संक्रमण हे येणाऱ्या दिवसात वाढणार असल्याची शक्यता असल्याचे तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टर अनुप मरार यांनी सांगितले आहे.

hinganghat issue
डॉक्टर अनुप मरार आणि सहकारी

By

Published : Feb 6, 2020, 6:18 PM IST

नागपूर - हिंगणघाट पीडितेची अवस्था अजूनही धोक्याच्या बाहेर नाही. उद्या पुन्हा तिला ड्रेसिंग केली जाणार असून, होऊ शकणारे संक्रमण हे येणाऱ्या दिवसात वाढण्याची शक्यता असल्याचे तिच्यावर उपचार करत असलेले डॉक्टर अनुप मरार म्हणाले. शिवाय पीडितेच्या श्वसन यंत्रणेमध्ये आणखी बिघाड होऊ शकतो व संक्रमण आणि श्वसन यंत्रणा या दोन्ही समस्या आव्हानात्मक वाटत असल्याचेही डॉक्टर म्हणाले. पीडितेवर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉक्टर अनुप मरार आणि सहकारी

हेही वाचा - हिंगणघाट जळीतकांड : 'कठोर कायद्यासाठी गृह विभागाला सूचना करणार'

पीडितेची नेत्र तज्ञांनी आज (गुरुवारी) तपासणी केली आहे. डोळ्याची सूज कमी झाली असून 'कोर्निया'मध्ये मात्र दृष्टी आहे, डोळ्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे कोर्निया असतो, हा भाग निकामी झालेला नाही. मात्र, पीडितेने अद्याप डोळे उघडलेले नाहीत.

हेही वाचा - हिंगणघाट प्रकरण : पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र चिंता कायम

ABOUT THE AUTHOR

...view details