महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगणघाट प्रकरण: पुढील 48 तास 'तिच्यासाठी' महत्वाचे - नागपूर बातमी

हिंगणघाट येथे एका तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला गेला. हल्ल्यात भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

hinganghat-fire-case-docter-report-nagpur
हिंगणघाट प्रकरण

By

Published : Feb 4, 2020, 12:53 PM IST

Updated : Feb 4, 2020, 1:20 PM IST

नागपूर- हिंगणघाट येथील घटनेतील तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील 48 तास तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, कालपेक्षा तिच्या प्रकृतीत किंचित सुधारणा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हिंगणघाट प्रकरण

हेही वाचा-हिंगणघाट 'छपाक': 'जो जैसा कर रहा हैं उसको वैसी ही सजा मिलनी चाहिए'

तरुणीच्या तोंडाला व श्वसन नलिकेला गंभीर इजा झाली आहे. तिला कृत्रिमरीत्या श्वासोच्छवास दिला जात आहे. त्वचेचे पाचही थर जळाल्याने जंतू संसर्ग होण्याचा धोका आहे. परंतु, या जंतू संसर्गाबाबत येत्या 1 ते 2 दिवसात माहिती मिळेल, असेही डाॅक्टरांनी सांगितले.

Last Updated : Feb 4, 2020, 1:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details