नागपूर -हिंगणघाट जळीतकांडातील पीडिता व्हेंटिलेटरवर असून वैद्यकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहे. आम्ही केलेल्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल याबाबत आम्ही आश्वस्त आहोत, असे वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार म्हणाले. आज त्यांनी रुग्णालयात पीडितेची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.
हिंगणघाट जळीतकांड : 'पीडिता व्हेंटिलेटरवर, वैद्यकीय पातळीवर प्रयत्न सुरू' - हिंगणघाट जळीतकांड पीडिता
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी रस्त्यावर सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सुनील केदार यांनी तिची भेट घेतली.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नांदोरी रस्त्यावर सोमवारी (३ फेब्रुवारी) प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिच्या नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सुनील केदार यांनी तिची भेट घेतली. त्यावेळी ते म्हणाले, शासनाने घटनेच्यादिवशी पीडितेला त्वरित मदत केली. यापुढेही मदत करत राहू. तसेच ती तिचे पुढील आयुष्यासाठी देखील तिला मदत करू. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. अशा घटनांना आळा बसायला हवा. त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.