नागपूर-शहराच्या शेजारी असलेल्या हिंगणा येथील एमआयडीसीतील व्यंकटेश उद्योग कारखान्याला रात्री आग लागली. या कारखान्यात प्रिंटिंगसाठी लागणारी इंक बनविण्याचे काम केले जायचे. मात्र,लॉकडाऊनमुळे या कंपनीतील काम बंद होते.
हिंगणा एमआयडीसीत इंक तयार करणारा कारखाना आगीत पूर्णपणे जळून खाक - nagpur
कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल (थिनर) ठेवले असल्याने आग वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती समजताच हिंगणा येथील अग्निशमन विभागाचे 11 बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीमुळे शेजारी असलेल्या दुसऱ्या कंपनीला सुद्धा आग लागली.
हिंगणा एमआयडीसीत इंक तयार करणारा कारखाना पूर्णपणे जळून खाक
कारखान्याला रात्री दोन वाजता आग लागली, त्यावेळी कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल (थिनर) ठेवले असल्याने आग वेगाने पसरली. आग लागल्याची माहिती समजताच हिंगणा येथील अग्निशमन विभागाचे 11 बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीमुळे शेजारी असलेल्या दुसऱ्या कंपनीला सुद्धा आग लागली.
अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. आगीत इंक तयार करण्याचा कारखाना पूर्णपणे जळून गेला आहे.आगीमुळे कंपनी मालकाचे मोठे नुकसान झाले.