Himachal Landslide : भूस्सखलनात मृत्यू झालेल्यांमध्ये नागपूरच्या प्रतीक्षा पाटलांचाही समावेश - नागपूर प्रतीक्षा
हिमाचल प्रदेशातील किन्नोर जिल्ह्यात घडलेल्या घटनेत जवळपास 11 पर्यटक होते. या मिनीबसमध्ये नागपूर जिल्ह्यातील पाटण सावंगी येथील प्रतीक्षा पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

Himachal Landslide
नागपूर - हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील सांगला चितकुल मार्गावर रविवारी दरड कोसळण्याची घटना घडली. यावेळी भूस्खलनामुळे पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सवर मोठी दरड कोसळली. या वाहनात राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्लीतील पर्यटकांचा समावेश होता. यात नागपूरच्या प्रतीक्षा पाटील या तरुणीसह 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यात इतरांवर उपचार सुरू आहे.