नागपूर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी उच्चांक गाठला आहे, एकाच दिवसात तब्बल २२२ रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे. आज तब्बल २२२ रुग्णांची भर पडल्याने नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ हजार ६८७ इतकी झाली आहे. तर, ९४ कोरोनाबाधित रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नागपुरात कोरोनाचा उच्चांक; एका दिवसात २२२ रुग्णांची वाढ, तर ९४ कोरोनामुक्त
नागपुरात एकाच दिवसात तब्बल २२२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रशासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरात दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. तर, आज एकाच दिवसात तब्बल २२२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, आज ९४ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरीदेखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २३०४ इतकी झाली आहे. या शिवाय आज पुन्हा ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपुरात एकूण ७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे ७० पैकी ५२ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत तर, १८ मृत्यू हे जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत. या मृतांमध्ये अमरावती आणि अकोला येथील रुग्णांचा समावेश आहे.
सध्या नागपुरातील ०७ ठिकाणी १ हजार ३१० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेयो) २६४, शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडीकल) ३१०, एम्समध्ये ४९, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये १४ आणि खासगी रुग्णालयात ४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये ६४ आणि आमदार निवासमध्ये ३६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्णांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६२.५७ टक्के इतके आहे, तर मृत्यूदर हा १.८९ इतका आहे.