महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर : गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त - नागपूर बातमी

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे बघायला मिळत आहे

नागपूर: गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

By

Published : Sep 2, 2019, 12:09 PM IST

नागपूर - गणेशोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नागपुरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या अनेक भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त

दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या नागपूर शहरात दोन मोठे नेते राहतात. त्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा नेहमीच सतर्क असते. गणेशोत्सव म्हटलं की पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेवर आणखीच ताण असतो. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आल्याचे बघायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details