नागपूर-मुख्यमंत्र्यानी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत नागपूरमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी सविधान चैकातून डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून रॅली काढण्यात आली. त्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय महामंत्री भुपेंद्र यादव, सरोज पांडे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या 6 उमेदवारांनी अर्ज दाखल केला.
जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल - politics of Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात आपला उमेदावारी अर्ज भरला. यामुळे नागपुरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला होता.
संपुर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूरच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दक्षिण पश्चिम ही सीट मुख्यमंत्र्यांची पारंपरिक सीट मानली जाते. इथून ते तीन वेळा निवडणून आले असून त्यांनी चौथ्यांदा अर्ज दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांची थेट लढत भाजप मधून काँग्रेसवासी झालेले बंडखोर आशिष देशमुख यांच्या सोबत होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महारॅलीच्या माध्यमातून एका प्रकारे भव्य शक्ती प्रदर्शन केले .