नागपूर- जिलह्याच्या उमरेड तालुक्यात असलेल्या बेला गावाजवळून वाहत असलेल्या नांद नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदीलगतच्या गावात शिरले आहे. येथील एका कंपनीतसुद्धा पाणी शिरले होते. त्यामुळे काही कर्मचारी अडकून पडले होते. त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने 18 तासानंतर सुखरूप बाहेर काढले आहे.
नागपूर पाऊस; नांद नदीच्या पुरात अडकलेल्या ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांची 18 तासानंतर सुटका - EVIATE NUTRITION COMPANY
पुराचे पाणी गावालगत असलेल्या एव्हीवेट न्यूट्रीशन कंपनीमध्ये देखील शिरले होते. त्यामुळे येथे 15 कामगार कालपासून कंपनीमधेच अडकून पडले होते. मंगळवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर आज आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सर्व लोकांची सुखरूप सुटका केली आहे.
गेल्या 4 दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. ज्यामुळे गावातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाण्याचे प्रमाण वाढल्याने सिंचन विभागाने शेंडेश्वर नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले होते. ज्यामुळे बेला, नांद आणि पिपळा गावात पुराचे पाणी शिरले होते. या शिवाय पुराचे पाणी गावालगत असलेल्या एव्हीवेट न्यूट्रीशन कंपनीमध्ये देखील शिरले होते. त्यामुळे येथे 15 कामगार कालपासून कंपनीमधेच अडकून पडले होते. मंगळवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर आज आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सर्व लोकांची सुखरूप सुटका केली आहे. आता पाऊस थांबला आहे, त्यामुळे पाणीदेखील ओसरले आहे.