नागपूर- जिल्ह्यात गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण शहरात सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. तर शहरभर कडेकोट पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी गणपती विसर्जनासाठी शहरातील फुटाळा तलावाचा वापर करता येणार आहे. मात्र इतर तलावात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
गणपती बाप्पाच्या सेवेनंतर आता त्यांना निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. त्यासाठी शहरात संपूर्ण आवश्यक तयारी करण्यात आली आहे. विसर्जनाचा पूर्ण कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडवे याची महापालिका आणि पोलीस खात्यावर मोठी जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने शहरातील फुटाळा तलावात विसर्जन करता येणार आहे. मात्र, इतर तलावात विसर्जन करण्यावर बंदी आहे. शहराच्या विविध भागात कृत्रिम टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असून लोकांना ते शोधता यावे यासाठी महापालिकेने एक अँपसुद्धा तयार केले आहे. त्या माध्यमातून लोकांना बाप्पाच्या विसर्जनासाठी घरा जवळ कृत्रिम टँक शोधता येणार आहे.