नागपूर -राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खटल्यांची नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायलयात आज सुणावणी होत आहे. त्यांच्यावर 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायलयाने देवेंद्र फडणवीस यांना समन्सही बजावला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वयक्तिक रित्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी अशी मागणी त्यांचे वकिल उदय डबले यांनी कोर्टाकडे काली आहे. मुंबईतील काही अनपेक्षित घडामोडींमुळे फडणवीस कोर्टात हजर राहू शकत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. तर, फडणवीसांनी स्वतः हजर राहावे अशी मागणी उके यांनी केली आहे. दरम्यान, फडणवीसांनी स्वतः व्यक्तिगत हजर राहावे की नाही याबाबत दुपारी 3 वाजता नाययलय निर्णय देणार आहे.
देवेंद्र फडणवीसांविरुध्दच्या खटल्याची आज सुनावणी त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे याप्रकरणी उके यांनी आधी दाखल केलेली याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने खारीज केली होती.
हेही वाचा -...तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांना शाप देईल - जितेंद्र आव्हाड
त्यानंतर उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिला होता. त्यानंतर, नागपूरच्या प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोव्हेंबरला उके यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणीला सुरुवात केली. नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना नोटीस जारी करण्यात आली होता. त्याच आधारावर आज प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी नियोजित आहे.