नागपूर - तांत्रिक कारणामुळे सिंचन घोटाळ्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुढे ढकलली आहे. ज्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार होती, त्यापैकी एक न्यायमूर्ती हे 2014 मध्ये याच प्रकरणात वकील म्हणून काम पाहत होते. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे आत्ताचे न्यायमूर्ती नितीन सांभारे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीला नकार दिला आहे.
..त्यामुळे सिंचन घोटाळा प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - सिंचन घोटाळा सुनावणी
सिंचन घोटाळ्याची सुनावणी च्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली. नैतिकतेच्या आधारे आत्ताचे न्यायमूर्ती नितीन सांभारे यांनी या प्रकरणाच्या सुनावणीला नकार दिला.
नागपूर उच्च न्यायालय
हेही वाचा -जिल्हाधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण... अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना
हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे पाठवण्याच्या सूचना रजिस्ट्रारला केल्या आहेत. त्यामुळे आता नवीन खंडपीठाकडे हे प्रकरण हस्तांतरित होईपर्यंत या प्रकरणाची सुनावणी थांबणार आहे. सिंचन घोटाळ्याबाबत शनिवारी न्यायालयात सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, न्यायामूर्ती नितीन सांभारे यांनी नैतिकतेच्या आधारे सुनावणीसाठी असमर्थता दर्शवली आहे.