नागपूर- कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने PPE (personal protective equipmemt) उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे पुरवा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रासह राज्य सरकारांना निर्देश
याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सरकारला नोटीस बजावून एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

नागपूरचे डॉक्टर जेरील बानाईत यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करीत सर्वोच्च न्यायालयाने नोटीस जारी केली आहेत.