महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह नागपूरमधील 3 जणांचा प्रवास, प्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर - Nagpur health department

पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली आहे. अशातच दुबई ते मुंबई या विमान प्रवासात नागपूरातील 3 जण होते, हे समोर आले आहे. या तिघांवरही नागपूर आरोग्य विभागाची करडी नजर आहे.

nagpur
पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह नागपूरमधील 3 जणांचा प्रवास

By

Published : Mar 11, 2020, 1:39 PM IST

नागपूर- दुबईहून आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना व्हायरसची लागल झाल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर यांची मुलगी आणि यांचा टॅक्सीचालकही कोरोना बाधित असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता वाढली आहे. अशातच दुबई ते मुंबई या विमान प्रवासात नागपूरातील 3 जण होते, हे समोर आले आहे. या तिघांवरही नागपूर आरोग्य विभागाची करडी नजर आहे.

पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह नागपूरमधील 3 जणांचा प्रवास

हेही वाचा -नागपुरात कोरोनाच्या दहशतीवर वैदर्भीय कवितेचा सावजी तडका

या तिघांमध्ये आई-वडील व तरुण मुलगा हे नागपूरचे प्रवासी होते. यापैकी मुलगा हा पुण्यातच थांबला असून पुरुष व महिला नागपूरात आले आहेत. या पती-पत्नीशी नागपूर आरोग्य विभागाने संपर्क केला असून त्यांचे समुपदेशन करणे सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तसेच गरज पडल्यास चाचणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details