नागपूर -जगप्रसिद्ध आयटी कंपनीचे (एचसीएल) संस्थापक चेअरमन व पद्मभुषण पुरस्कार प्राप्त शिव नाडर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत. ही घोषणा संघाचे नागपूर संचालक राजेश लोया यांनी केली. ८ ऑक्टोबर संघाचा स्थापना दिनाचा कार्यक्रम नागपूर येथे होणार आहे.
हेही वाचा - शिवसेना पैसे घेवून मंत्री, आमदार बनवते; नारायण राणेंचा गंभीर आरोप
संघाच्या कार्यक्रमाला याआगोदरही बरेच मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहिलेले आहेत. नोबेल पारितोषीक विजेते कैलाश सत्यार्थी गेल्यावर्षीच्या कार्यक्रमात उपस्थित होते. संघ संस्थापक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना ८ ऑक्टोबर १९२५ साली विजयादशमीच्या दिनी केली होती. यानमित्ताने संघाचा दरवर्षी नागपूर येथे संघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होतो.