नागपूर - गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सी-६० फोर्सचे १५ जवान हुतात्मा झाल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. या भ्याड हल्ल्याचे चोख प्रतिउत्तर देणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गडचिरोलीमधील नक्षलवादी हल्ल्याचे चोख उत्तर देणार - हंसराज अहिर - हंसराज अहिर
गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सी-६० फोर्सचे १५ जवान हुतात्मा झाल्यानंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, की गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांसोबतच्या लढाईत आमच्या जवानांनी मोठे यश मिळवले आहे. सुरक्षा एजन्सीच्या कर्तव्यदक्षतेमुळे नक्षली चळवळ बॅकफूटवर गेली आहे. आज नक्षलींनी केलेल्या भ्याड हल्यात १५ जवानांना हौतात्म्य आले आहे. नक्षलींच्या या हल्ल्याचे उत्तर देण्यासाठी सुरक्षा एजन्सी तयार, असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली.
नक्षलवाद्यांना निवडणूक मान्य नसल्याने त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, गडचिरोलीच्या नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या धमकीला भीक न घालता सर्वाधिक मतदान केले होते हे उल्लेखनीय आहे.