महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूर जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट

रामटेक शहरात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अर्धा तास पावसाने हजेरी लावली. यात पावसात जवळपास 10 मिनिटे गारपीट झाली. रामटेक आणि कोदामेंडीमध्ये पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत अचानक आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

unseasonal rains in Nagpur
अवकाळी पावसासह गारपीट

By

Published : May 11, 2021, 9:14 AM IST

नागपूर -जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह तुरळक स्वरूपाचा पावसाच्या सरी बरसल्या आहे. वादळी वाऱ्यासह शहरात काही भागात पाऊस पडला. मात्र सायंकाळी रामटेक परिसराला गारपीटीसह जोरदार पावसाने झोडपून काढले.

अवकाळी पावसासह गारपीट

रामटेक शहरात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अर्धा तास पावसाने हजेरी लावली. यात पावसात जवळपास 10 मिनिटे गारपीट झाली. रामटेक आणि कोदामेंडीमध्ये पाऊस आणि गारपिटीची नोंद झाली आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत अचानक आलेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. यामुळे परिसरात काही वेळ विद्यूत पुरवठाही खंडित झाला होता. यात नुकसानी संदर्भात अजून नोंद प्रशासकीय यंत्रणेकडून झाली नसल्याची माहिती पुढे येत आहे.

नागपूरातही काही पावसाने हजेरी

नागपूरात शहरातील काही भागात पाचच्या सुमारास पावसाने हजेरी लावली आहे. यात काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details