महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामठी कॅन्टोनमेंट रुग्णालयातील कोविड केअर सेंटरची पालकमंत्र्यांनी केली पाहणी - covid Center Inspection Nitin Raut

कामठी कॅन्टोनमेंट रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. कोविड नियंत्रण संदर्भात सुरू असलेले रुग्णालयाचे नियोजन आणि व्यवस्थापन याची त्यांनी पाहणी केली.

Kamptee Cantonment covid Center Inspection Nitin Raut
कामठी कॅन्टोनमेंट कोविड केंद्र पाहणी नितीन राऊत

By

Published : May 16, 2021, 5:44 PM IST

नागपूर -कामठी कॅन्टोनमेंट रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. कोविड नियंत्रण संदर्भात सुरू असलेले रुग्णालयाचे नियोजन आणि व्यवस्थापन याची त्यांनी पाहणी केली.

कोविड सेंटरची पाहणी करतानाचे छायाचित्र

हेही वाचा -नागपुरात म्यूकरमायकोसिस आजारावर अ‌‌ॅक्शन प्लॅनची निर्मिती; अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा

कामठीच्या ग्रामीण भागात कोविड संकट काळात रुग्णांना निशुल्क सेवा देण्यात उप जिल्हा रुग्णालय आघाडीवर होते. याच प्रकारची सेवा कामठी कॅन्टोनमेंट येथील रुग्णालयातून पुरविण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांनी आढावा घेतला. या ठिकाणी ३० खाटांची व्यवस्था ऑक्सिजन सुविधेसह करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमुळे उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकेल, अशी आशा राऊत यांनी व्यक्त केली.

कोविड सेंटरची पाहणी करतानाचे छायाचित्र

यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुरेश भोयर, नगरसेवक निरज लोणारे, नगरसेवक काशी प्रधान, महेंद्र भुटानी, राहुल कानोजे, आनंद पिल्ले, बबलू तिवारी, तहसीलदार हिंगे, खंडविकास अधिकारी गराडे, मुख्यधिकारी संदीप बोरकर, पोलीस निरीक्षक विजय मालचे, डॉ. अरुंधती काळे, अभियंता दीपक कामटे प्रामुख्याने उपस्थित होते.

कोविड सेंटरची पाहणी करतानाचे छायाचित्र

हेही वाचा -नागपुरात सक्रीय रुग्णसंख्या 33 हजारांवर; शनिवारी 1500 रुग्ण आढळले

ABOUT THE AUTHOR

...view details