नागपूर -जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या निधीत तिप्पट वाढ झाल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. २०१३-१४ यावर्षात डीपीडीसीअंतर्गत जिल्ह्याला केवळ १७५ कोटी रुपये मिळत होते. मात्र, यंदा ७७६ कोटी ८७ लाख रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले.
नागपूरच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत तिप्पट वाढ - पालकमंत्री बावनकुळे - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
जिल्हा वार्षिक योजना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. डीपीडीसीअंतर्गत जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीत गेल्या ५ वर्षात तिप्पट वाढ झाली. यंदा डीपीडीसीअंतर्गत ७७६ कोटी ८७ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

गेल्या २०१३-१४ ला जिल्ह्याला डीपीडीसीअंतर्गत खर्चासाठी केवळ १७५ कोटी मिळायचे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी या योजनांच्या निधीमध्ये वाढ होत आहे. अखेर यावर्षी नागपूर जिल्ह्याला ७७६ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणतेही विकास कामे निधीअभावी रखडणार नसल्याचा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. गेल्यावर्षी ६५० कोटींची जिल्हा वार्षिक योजना यावर्षी ७७४ कोटींवर गेली असल्याने यामध्ये १९ टक्क्यांची वाढ झालेली आहे.