नागपूर :भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानवडॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्या 66 व्या महापरिनर्वाण दिनानिमित्त आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयानांतर्फे अभिवादन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच शेकडो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर असलेल्या डॉ. बाबासाहेबांचा अस्थीकलशाचे दर्शन घेऊन महामानवाचा जयघोष करीत आहे. विविध बौद्ध संघटना, समता सैनिक दलातर्फे आदरांजली वाहून दीक्षाभूमीवर असलेल्या त्यांचा पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले जात (Greetings from Buddhist followers at Diksha Bhoomi) आहे.
Mahaparinirvan din : आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायींकडून अभिवादन ; अस्थीकलशाचे दर्शन घेऊन महामानवाचा जयघोष - Buddhist followers
आज महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan din) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आज नागपुरातील दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयानांतर्फे अभिवादन करण्यात येत (Greetings from Buddhist followers) आहे. तेथे त्यांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही सुरक्षित (Diksha Bhoomi in Nagpur) आहेत.
बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा : मुंबईच्या चैत्यभूमी येथे जाणे सर्वांना शक्य होत नाही. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील हजारो अनुयायी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येतात. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात पवित्र दीक्षाभूमीसह डॉ. बाबासाहेबांच्या अस्तित्वाच्या अनेक पाऊलखुणा आजही सुरक्षित (occasion of Mahaparinirvan din) आहेत.
दीक्षाभूमीचा इतिहास :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा १४ ऑक्टोबर १९५६ला घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात होता. मात्र, ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली असल्याची भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची १४ एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर १९७८ साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम २००१ साली पूर्ण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दीक्षाभूमीला 'अ' वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले (Diksha Bhoomi in Nagpur) आहे.