महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पदवीधर निवडणूक : मतमोजणीसाठी नागपूर जिल्हा प्रशासन सज्ज

नागपूर विभागात एकूण ६४. ३८% इतके मतदान झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच चूरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय कोण जिंकणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीच्या कार्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहीती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.

नागपूर
नागपूर

By

Published : Dec 3, 2020, 7:02 AM IST

नागपूर- नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला आज (गुरूवार ) सकाळी ८ वाजतापासून सुरुवात होणार आहे. मानकापूर स्टेडिअम येथे ही मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहीती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे. शिवाय एकूण मतदानाची टक्केवारी पाहता ५ फेऱ्यांपर्यंत ही मतमोजणी जाईल. अशी शक्यता विभागीय आयुक्तांनी वर्तविली आहे.

विभागीय आयुक्त संजीव कुमार माहिती देताना..

१९ उमेदवार रिंगणात -

नागपूर विभागात एकूण ६४. ३८% इतके मतदान झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच चूरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय कोण जिंकणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. प्रशासनाकडून मतमोजणीच्या कार्याची तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहीती विभागीय आयुक्तांनी दिली आहे. दरवर्षी पेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असल्यामुळे मतमोजणीसाठी उशीर होवू नये, म्हणून प्रशासन सर्व तयारी करत असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. या निवडणूकीत एकूण १९ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांचे भवितव्य सध्या तरी मतपेटी बंद आहे.

मतमोजणीचे प्रात्यक्षिक -

खबरदारी म्हणून मतमोजणी करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांचे दोन वेळा प्रात्याक्षिक करण्यात आल्याची माहीती आयुक्तांनी दिली आहे. तर मतमोजणीला सुरूवात करतांना टप्प्या टप्प्यानुसार मतपेट्या उघडल्या जातील असेही त्यांनी सांगितले. सध्या सर्व मतपेट्या संरक्षित क्षेत्रात ठेवल्या असून अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे.

मतमोजणीसाठी २७९ जणांची यंत्रणा -

मतमोजणीसाठी एकूण २८ टेबल लावण्यात आले आहे. तसेच ७ प्रमुख अधिकारी आणि ३० व्यवस्थापन अधिकारी व इतर कर्मचारी मिळून २७९ इतकी यंत्रणा या मतमोजणीसाठी नेमण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. शिवाय पहिल्या टप्प्यात प्रत्येक टेबल वर २५ - २५ चे बंच एकत्रित करून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. एकंदरीतच दोन टप्प्यात ही मतमोजणी होणार असून ५ फेऱ्यांमधे पूर्ण मतमोजणी आटोपेल, अशी शक्यताही आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा-स्वाभिमानी करणार रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

हेही वाचा-खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details