नागपूर - कोरोनाबाधितासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी असल्याने उपयुक्त ठरले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने व्रिकीची तक्रार अद्यापपर्यंत आली नसल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज(शुक्रवार) सांगितले आहे. प्रशासन या संदर्भात दक्ष असून या इंजेक्शनचा काळाबाजार किंवा निर्धारित किंमतीपेक्षा जास्त भावाने विक्री करत असल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे
रेमडेसिवीर विक्री संदर्भात प्रशासन दक्ष; जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे - नागपूर कोविड स्थिती
रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने व्रिकीची तक्रार अद्यापपर्यंत आली नसल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज(शुक्रवार) सांगितले आहे. मात्र, प्रशासन यावर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेमडीसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी अन्न व औषधी प्रशासन विभाग लक्ष ठेऊन आहे. नुकतीच रेमडेसिवीर पुरवठा करणाऱ्या सिप्ला, हेटेरो, मायलन, गायडस या कंपन्यांच्या नागपूर येथील स्थानिक प्रतिनिधींसोबत जिल्हा प्रशासनाने बैठक घेवून योग्य त्या सूचना दिल्या होत्या. अन्न व औषध प्रशासन विभागाने कोरोना संदर्भातील कोणत्याही लसीबाबतची कृत्रिम टंचाई जाणवत कामा नये. तसेच नागपूर जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये आवश्यक असणाऱ्या रेमडीसीव्हर औषधांचा नियमित व सुलभ पुरवठा कोविड रूग्णालयांना प्राधान्याने व्हावा, असे या पुरवठादारांना निर्देश देण्यात आले आहेत.
औषधांचा तुटवडा असल्याबाबत कोरोनाबाधित यांच्या नातेवाईकांना काही ठिकाणी सांगण्यात येत आहे. अशा पद्धतीने औषधांचा तुटवड्याबद्दल अफवा पसरू नये. तसेच नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करून गोंधळ उडवू नये, अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने केली आहे.