राज्यपाल कोश्यारींची नागपुरातील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी.. - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नागपूर बातमी
भगतसिंग कोश्यारी हे मुंबईतील राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्याने गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुक्कामी आहेत. याच पार्श्वभूमीवर ते शहरातील व आजूबाजूच्या प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणांना भेट देत आहेत. रविवारी त्यांनी सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट दिली.
राज्यपालांची नागपूरातील विविध प्रसिद्ध स्थळांना भेटी..
नागपूर- राज्यपाल भगसिंग कोश्यारी हे गेल्या काही दिवसांपासून नागपुरात मुक्कामी आहेत. शहरातील विविध स्मृती स्थळांना ते भेटी देऊन अभिवादन करत आहेत. यात त्यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्मृतीभवन, हेडगेवार यांच्या स्मृतीचे दर्शन, दिक्षाभूमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केले.