नागपूर -उपराजधानी नागपुरात पुन्हा एकदा गावगुंडानी प्रचंड हैदोस घातल्याची संतापजनक घटना घडली आहे. काल रात्री गुंडांनी अनेक भागात उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे अजनी आणि बेलतरोडी भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूरात गुंडाचा हैदोस; दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फोडल्या 20 गाड्यांच्या काचा - नागपूरात गुंडानी फोडल्या कारच्या काचा
गावगुंडांनी बुधवारी रात्री उशिरा नरेंद्रनगर, बोरकुटे लेआऊट, नवजीवन सोसायटी, पिमजी कॉलोनी, पावनभूमी लेआऊटसह आजूबाजूच्या परिसरात 20 पेक्षा जास्त कारची तोडफोड केली. पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याने गाव गुंडांची हिंमत वाढत आहे.

गावगुंडांनी रात्री उशिरा नरेंद्रनगर, बोरकुटे लेआऊट, नवजीवन सोसायटी, पिमजी कॉलोनी, पावनभूमी लेआऊटसह आजूबाजूच्या परिसरात 20 पेक्षा जास्त कारची तोडफोड केली. तर एका कारला पेट्रोल टाकून जाळले. कार पेटवताना तिघे गुंड सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. शिवाय नागपूरच्या अजनी भागात ही काही कार फोडल्याच्या घटना घडल्या आहे.
विशेष म्हणजे या सर्व परिसरात उच्च शिक्षित मध्यम वर्गीय, नोकरदार आणि सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य आहे. परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. महत्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहरात अश्या घटना या सातत्याने घडत आहेत. मात्र, पोलिसांकडून फारसी कारवाई केली जात नसल्याने गाव गुंडांची हिंमत वाढत आहे.