महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरची संपत्ती जप्त - स्वयंघोषीत डॉन संतोष आंबेकरची संपत्ती जप्त

कुख्यात गुंड संतोष आंबेकरने नुकतेच गुजरातच्या व्यापाऱ्याला धमकावून ५ कोटी आणि नंतर १ कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात नेताना हाफपॅन्ट घालून रस्त्यावरून पायी फिरविले होते. पोलिसांच्या त्या युक्तीला आता यश येऊ लागले असून त्याच्याविरोधात आता एक-एक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

नागपुरातील स्वयंघोषीत डॉन संतोष आंबेकरची संपत्ती जप्त

By

Published : Oct 29, 2019, 12:46 PM IST

नागपूर -शहरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या ५ महागड्या कार, २ दुचाकी यासह एकूण साडेपाच कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

नागपुरातील स्वयंघोषीत डॉन संतोष आंबेकरची संपत्ती जप्त

कुख्यात गुंड संतोष आंबेकरने नुकतेच गुजरातच्या व्यापाऱ्याला धमकावून ५ कोटी आणि नंतर १ कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात नेताना हाफपॅन्ट घालून रस्त्यावरून पायी फिरविले होते. पोलिसांच्या त्या युक्तीला आता यश येऊ लागले असून त्याच्याविरोधात आता एक-एक तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत.

संतोष आंबेकरने एका महिला डॉक्टरला धमकावून बलात्कार केल्याची तक्रार संबंधित महिलेने दाखल केली आहे. तसेच काही व्यापाऱ्यांनी धमकावून खंडणी मागितल्याची तक्रार देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. याविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या आधारावर पोलिसांनी संतोष आंबेकरविरोधात मकोका लावत त्याची संपत्ती जप्त करणे सुरू केले आहे. पोलिसांनी मंगळवारी त्याच्या ५ महागड्या कार, दोन महागड्या दुचाकी यासह एकूण साडेपाच कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

दरम्यान, नागरिकांनी निर्धास्तपणे कोणत्याही भीतीशिवाय समोर येऊन संतोष आंबेकरविरोधातील तक्रारी पोलिसांकडे नोंदवल्यास कठोर कारवाई करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details