नागपूर- केंद्र सरकारने आता सुवर्ण अलंकारांसाठी एचयुआयडी अर्थात 'हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन डिजिट'ची सक्ती केली आहे. ही प्रक्रिया जाचक असल्याचा आरोप करत देशभरातील सराफ व्यावसायिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारने हॉलमार्किंगची एचयुआयडी प्रक्रिया तातडीने रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि. 23 ऑगस्ट) सराफ व्यावसायिकांनी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारला आहे. नागपुरातील सोने-चांदी व्यापाऱ्यांनी हातात फलक घेत आम्ही ज्वेलर्स आहोत मुनीम नाही, असा नारा दिला. हॉलमार्कला आमचा विरोध नाही पण 'एचयूआयडी'ला विरोध असल्याचेही जाहीर केले. तसेच हे धोरण ग्राहकांसह व्यापाऱ्यांचे नुकसान करणारे असल्याचा दावा केला जात आहे.
नागपूर जिल्ह्यात जवळपास छोटे सोने-चांदीची विक्री करणारे 3 हजार दुकानदारांनी आपले दुकाने बंद ठेवत आंदोलनात सहभाग घेतला. हॉलमार्किंग गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असताना. एचयुआयडी ही प्रक्रिया आता नव्याने सुरू करण्यात आली आहे. हे व्यापारी व ग्राहकांना त्रासदायक ठरत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कोणत्या ग्राहकाजवळ किती सोने आहे हे जाणून घेणे सोपे आहे. यामुळे ग्राहकांची गोपनियतेचेही भंग होण्याची शक्यता आहे. 'एचयुआयडी'मुळे दागिने बनविल्यानंतर सोन्याचे दर कमी-जास्त झाल्यास अडचण निर्माण होऊ शकते. तसेच एचयुआयडी दानिग्याचे एकदा वज झाल्यास त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात येत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे थोडोसे सोने वाढवण्यापेक्षा संपूर्ण नवे अलंकार ग्राहकांना घ्यावे लागेल आणि याचा ग्राहकांना नुकसान होईल. तसेच या कायद्यांमध्ये काही जाचक अटींमुळे व्यापाऱ्यांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशीही तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्या बाबींना विरोध करण्यासाठी सोमवार (दि. 23 ऑगस्ट) सराफ बाजार बंद ठेवण्यात आलेला आहे. एचयुआयडीत बदल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यता आला आहे.
चोरी, दरोड्याचे प्रकार वाढण्याची भीती
एचयुआडीमुळे कोणत्या ग्राहकाकडे किती सोने आहे. याबाबत सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. यामुळे ज्यांच्याकडे जास्त सोने आहे, त्यांच्या घरी चोरी होण्याची तसेच त्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती सचिव राजेश रोकडे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -गंगा जमुनात राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आमने सामने, जाणून घ्या काय आहे प्रकरण..?