महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 8, 2021, 10:05 PM IST

ETV Bharat / state

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर द्या; केंद्रीय पथकाच्या सूचना

केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत वाढता मृत्यूदर आणि रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच, नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले.

Central Health Team Contact Trace suggest Nagpur
केंद्रीय आरोग्य पथक बैठक नागपूर

नागपूर - केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत वाढता मृत्यूदर आणि रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याच्या सूचना केल्या. तसेच, नियमांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले.

हेही वाचा -नागपूरात बेडच्या उपलब्धतेसह अन्य माहितीसाठी समन्वयक कक्षात संपर्क करा- जिल्हाधिकारी

केंद्रीय आरोग्य पथकाने जिल्हाधिकारी कार्यलयात बैठक घेतली. यात नागपूर जिल्ह्याची कोरोनाची प्रत्यक्ष स्थिती, त्यावरील उपाययोजना, कोविड रुग्णांसाठी उपलब्ध आरोग्य सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी तयार करण्यात आलेला प्रोटोकॉल, तसेच लसीकरण मोहीम याबद्दल माहिती घेण्यात आली. पथकामध्ये दिल्लीचे एम्स रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉ. हर्षल साळवे, नागपूर एम्सचे प्रो. डॉ. पी.पी. जोशी हे बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन जिल्ह्यात कोविड नियंत्रणासाठी तपासण्यावर विशेष भर देत असल्याचे सांगण्यात आले. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्या तपासण्या करून आवश्यक औषोधोपचार केला जात आहे. तसेच, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांसाठी विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, तसेच वारंवार हात धुणे, या त्रिसुत्रीचा वापर करण्यासाठी प्रत्येक गावनिहाय विशेष चमू तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रभावी उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिली.

जिल्ह्यातील 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी तालुकानिहाय विशेष समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकप्रतिनिधींचा सहभाग असल्यामुळे लसीकरणाला चांगला प्रतिसाद ‍मिळत आहे. लसीकरणासंदर्भात ग्रामीण जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी प्रचार व प्रसिद्धी मोहिमेवर विशेष भर देण्यात आल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढला असल्याचेही केंद्रीय वैद्यकीय पथकाला सांगण्यात आले.

कोरोना उपाययोजनेंतर्गत कार्यान्वित झालेले डेडिकेटेड कोविड रुग्णालये, विलगीकरण केंद्रे ग्रामीण भागात, तसेच नगरपालिका क्षेत्रात तपासणी केंद्रे व लसीकरण केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता आदीबाबतही या पथकाला माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसोबत केंद्रीय पथकाने चर्चा करून व्यवस्थेचा आढावा घेतला.

बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा समन्वयक विवेक इलमे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, अविनाश कातडे यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -नागपुरात कोरोना परिस्थिती गंभीर; इमारतीतील रहिवासियांवर कडक निर्बंध

ABOUT THE AUTHOR

...view details