नागपूर -मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे. मराठा समाजाने माझा भूमिकेवर नाराज होण्याचे काही कारण नाही, कारण मी एसईबीसी रद्द करा, अशी भूमिका मांडली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला.
...तर आज ही वेळ आली नसती -
काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात बनवल्या कायद्याला बळकटी देण्याचे काम केले असते, तर आज ही वेळ आली नसती. पण घटना दुरुस्ती केल्याने हा नवा कायद्याचा पेच निमार्ण झाला. यात सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार 102 व्या घटना दुरुस्ती पूर्वी आरक्षण दिलेल्या राज्यांना संरक्षण देण्याचे काम केले. पण मराठा आरक्षण 102 व्या घटना दुरुस्ती नंतरचे असल्याने अडचण आली असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या संदर्भात कोणावर आरोप करण्याचे कारण नसून ज्या गोष्टी चुकल्या त्या मोठ्या मनाने मान्य करायला पाहिजे, असही टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याच्या केवळ अफवा; राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण