महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कामठीतून बावनकुळेंनाच उमेदवारी द्या; सुलेखा कुंभारेंची जाहीर मागणी - Bahujan Republican ekta manch Support

बावनकुळेंनी कामठी मतदारसंघात आणि जिल्ह्यात विकास कामे केली आहेत. त्यामुळे उमेदवारी त्यांना द्यावी, अशी मागणी बहुजन एकता मचंच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सुलेखा कुंभारे

By

Published : Oct 3, 2019, 10:47 AM IST

नागपूर- बावनकुळेंनाच कामठीत उमेदवारी द्या, अशी जाहीर मागणी बहुजन एकता मचंच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपने मला उमेदवारीची विचारणा केली होती. म्हणून भाजपच्या पहिल्या यादीत कामठीचा उमेदवार जाहीर न केल्याचा दावा सुलेखा कुंभारे यांनी केला आहे.

माहिती देताना बहुजन एकता मचंच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारे

येत्या विधानसभा निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा भाजपला बिनशर्त पाठिंबा आसल्याचे देखील त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये बहुजन एकता मंचने भाजप सरकारला बिनशर्त जाहीर पाठिंबा दिला होता. भाजप सरकारने बहुजन हिताची कार्य केली आहेत. चैत्यभूमी, लंडनमधील बाबासाहेबांचे निवास आणि भारतातील बुद्धीस्ट सर्किट बनविणे, अशी विकास कामे भाजप सरकारने केली आहेत. त्याचबरोबर बावनकुळेंनी कामठी मतदारसंघात आणि जिल्ह्यात विकास कामे केली आहेत. त्यामुळे उमेदवारी त्यांना द्यावी, अशी मागणी सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

हेही वाचा-तिकीट नाकारल्याने काँग्रेसचे अतुल लोंढे नाराज

ABOUT THE AUTHOR

...view details