नागपूर:वेदांता फॉक्सकॉनच्या नंतर आता टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला (Mungantiwar Opinion on Tata Air Bus Project) आणि सफ्रॉन प्रकल्प हैदराबाद गेला आहे. यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. सरकारला कोंडीत पकडण्याची उत्तम संधी असल्याने विरोधकांकडून जोरदार हल्ले चढवले जात आहेत. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर (Mungantiwar Reply to Opponents) दिले आहे. टाटाचा राज्य सरकारसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती (Tata project was coming up in Maharashtra) किंवा या संदर्भात बैठका देखील झालेल्या नाहीत. त्यामुळे विरोधकांनी असे कुठलेही आरोप करणे चुकीचे (Opposition Accuses Wrong About Tata Project) असल्याचे मुनगंटीवार म्हणाले आहेत. विरोधकांनी पुरावा म्हणून एकतरी कागद समोर आणावा असे आवाहन त्यांनी दिले आहेत. Nagpur News, Mungantiwar On Tata Airbus Project
Mungantiwar On Tata Airbus Project : टाटाचा प्रकल्प राज्यात येणार होता याचे पुरावे द्या; सुधीर मुनगंटीवारांचे विरोधकांना प्रतिआवाहन - टाटा प्रकल्पाविषयी विरोधकांचे आरोपी चुकीचे
वेदांता फॉक्सकॉनच्या नंतर आता टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला (Mungantiwar Opinion on Tata Air Bus Project) आणि सफ्रॉन प्रकल्प हैदराबाद गेला आहे. यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. सरकारला कोंडीत पकडण्याची उत्तम संधी असल्याने विरोधकांकडून जोरदार हल्ले चढवले जात आहेत. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांच्या आरोपांना प्रतिउत्तर (Mungantiwar Reply to Opponents) दिले आहे. टाटाचा राज्य सरकारसोबत कोणतीही चर्चा झाली नव्हती (Tata project was coming up in Maharashtra) किंवा या संदर्भात बैठका देखील झालेल्या नाहीत. (Nagpur News)
मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण-शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही नेते पत्रकार परिषद घेत आहेत,पण कागद समोर आणून दाखवायला कुणीही तयार नाही. शिवसेना किंवा राष्ट्रवादी यांच्या बैठकीचे मिनिट्स दाखवले कुणीही दाखविले नाहीत. टाटाने सरकारला कुठले पत्र दिलेले नाही. टाटाच्या संदर्भात अधिकाऱ्यांसोबत तत्कालीन उद्योग मंत्र्यांच्या बैठका झाल्या नाहीत. त्यांच्या सरकारने कुठले पत्र दिले नाही. एखाद्या एमआयडीसीसाठी अर्ज केला नाही. असे असताना अशा पद्धतीने त्यांनी हवा करणे सरू केले की, त्याचे आश्चर्य वाटते, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
कॅग चौकशी महत्वाची:महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झालेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या कामाची कॅग चौकशी केली जाणार आहे, याबाबत विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, कॅगचे ऑडिट होत असते आणि मागणी केल्यावर ते आता अधिक वेगाने होईल. त्या कामात अनियमितता, गैरप्रकार, भ्रष्ट्राचार झाला असेल तर तो उघडकीस येईल. कॅगचं ऑडिट करणे कायद्याच्या दृष्टिनेही गरजेचे आहे. त्यामुळे ते होईल आणि त्यातून सत्य काय ते बाहेर येईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.