महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निराधार योजनेचे पैसे तत्काळ वाटप करा, अन्यथा.. बावनकुळे यांचा इशारा

या योजने संदर्भात शासन निर्णय पारित करूनसुद्धा कोणतेच सकारात्मक निर्णय का घेण्यात आले नाही? असा सवाल करत शासनाकडून लाभार्थ्यांना वेठीत धरण्याचे काम सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. ही बाब शासनाने गांभीर्याने घेऊन वेळीच तिला निकाली काढावे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आंदोलन उभारू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Oct 12, 2020, 6:44 PM IST

नागपूर- मागील ६ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची रक्कम तात्काळ वाटप करा. या मागणीसाठी नागपूर भाजपाकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शिवाय, कोरोना सारख्या महामारीत ही रक्कम लाभार्थ्यांना का दिली नाही? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. योजनेची रक्कम लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी बावनकुळे यांनी दिला. एकीकडे महामारीने नागरिक त्रस्त आहेत. अनेकांना आर्थिक अडचणी येत आहेत. अशावेळी संजय गांधी योजने अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ न देता थट्टा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

माहिती देताना भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे

शिवाय, या योजने संदर्भात शासन निर्णय पारित करूनसुद्धा कोणतेच सकारात्मक निर्णय का घेण्यात आले नाही? असा सवाल करत शासनाकडून लाभार्थ्यांना वेठीत धरण्याचे काम सुरू असल्याची टीका बावनकुळे यांनी केली. ही बाब शासनाने गांभीर्याने घेऊन वेळीच तिला निकाली काढावे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभर आंदोलन उभारू, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

हेही वाचा-राज्यात वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनेविरोधात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश

ABOUT THE AUTHOR

...view details