महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकरानेच केला 'त्या' मॉडेलचा खून; फेसबुकवरून लागला शोध - केलवाद

तिची ओळख अश्रफ शेख नावाच्या युवकसोबत झाली. त्यांचे प्रेम संबंध जुळून आले. मात्र काही दिवसांपासून काही कारणाने दोघात दुरावा निर्माण व्हायला लागला. मात्र घटनेच्या दिवशी दोघेही कारमध्ये मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या हायवेने निघाले. त्यावेळी दोघांनी एका धाब्यावर जेवण करून मद्य प्राशन केले. त्यानंतर गाडीतच दोघांमध्ये वाद झाली. या वादातून त्याने तिची हत्या केली.

प्रियकरानेच केला प्रेयसीचा खून

By

Published : Jul 15, 2019, 2:56 PM IST

Updated : Jul 15, 2019, 5:38 PM IST

नागपूर - जिल्ह्यातील केलवादजवळ दोन दिवसांपूर्वी एका युवतीचा मृतदेह मिळाला होता. या प्रकरणाचा ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. मृत तरुणीचे नाव खुशी परिहार असे असून तिच्या प्रियकरानेच तिचा खून केला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आरोपीचे नाव अश्रफ शेख असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खुशी 19 वर्षांची होती तर अश्रफ 21 वर्षाचा आहे.

प्रियकरानेच केला 'त्या' मॉडेलचा खून

खुशी परिहार ही तरुणी मॉडेलिंग क्षेत्रात भविष्य घडवण्याची इच्छा मनाशी बाळगून प्रयत्न करत होती. त्यामुळे तिचे आईवडिलांशी पटत नव्हते. दरम्यान, ती काही काळ मावशीकडे राहायला होती. तेथे तिची ओळख अश्रफ शेख नावाच्या युवकसोबत झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळून आले. मात्र, काही दिवसांपासून काही कारणाने दोघात दुरावा निर्माण व्हायला लागला. मात्र, घटनेच्या दिवशी दोघेही कारमध्ये मध्यप्रदेशच्या दिशेने जाणाऱ्या हायवेने निघाले. त्यावेळी दोघांनी एका धाब्यावर जेवण केरून मद्यप्राशन केले. त्यानंतर गाडीतच दोघांमध्ये वाद झाली. या वादातूनच त्याने तिची हत्या केली.

त्यानंतर आश्रफने तिचा मृतदेह रोडच्या शेजारी झाडीझुडपात फेकून दिला. पोलिसांना जेव्हा खुशीचा मृतदेह आढळून आला तेव्हा तो छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. त्यामुळे तिची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलिसांनी सोशल मीडियाचा आधार घेत फेसबुकच्या माध्यमातून तिची ओळख पठविली. तिच्या पायात असलेल्या बुटावरून तिची ओळख पटली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी हा तिचा प्रियकर अश्रफच असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अश्रफने तिच्यावर पैसे उधळले. मात्र, आता ती त्याच्याकडे कानाडोळा करत असल्याने तो नाराज होता, याच कारणाने त्याने तिची हत्या केली.

Last Updated : Jul 15, 2019, 5:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details