नागपूर-जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील झिल्पी परिसरात एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाला कंटाळून मुलीने विहिरीत उडी घते जीवन संपवले आहे.
एकतर्फी प्रेम करणाऱ्याच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या - नागपुरात एकतर्फी प्रेमातून मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या
पीडित मुलीवर एका 22 वर्षीय मुलाचे एकतर्फी प्रेम होते. आकाश राठोड असे एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो नेहमीच मुलीचा पाठलाग करत होता. तिच्याकडे लग्नाची मागणी करायचा. मात्र, मुलीचा यासाठी नकार होता.
हेही वाचा-सुरत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा
पीडित मुलीवर एका 22 वर्षीय मुलाचे एकतर्फी प्रेम होते. आकाश राठोड असे एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलाचे नाव आहे. तो नेहमीच मुलीचा पाठलाग करत होता. तिच्याकडे लग्नाची मागणी करायचा. मात्र, मुलीचा यासाठी नकार होता. दरम्यान, 23 डिसेंबरला दोघांचे भांडण झाले. आकाशने शाळेत जाऊन मुलीला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी दुपारी आकाश त्याच्या लहान भावासोबत (प्रकाश राठोड) शाळेत आला. त्यांनी मुलीला लग्नाला नकार दिल्याचा जाब विचारला. त्यानंतर मुलीला शिवीगाळ करून शाळेत सर्वांसमोर ओढत नेऊन मारहाण केली. हे सहन न झाल्यामुळे मुलीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.