नागपूर- राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा नुकताच पार पडला. या लग्नात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडर भेट देत इंधनदरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध -

सध्या पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ ही सर्वसामान्यांची कंबरड मोडणारी आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा मुलगा कुणाल याच्या विवाहात युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंग आणि पदाधिकाऱ्यांनी चक्क वधू-वरांना पेट्रोल-डिझेल आणि सिलेंडर भेट दिले. तुमसर येथे हा विवाह पार पडला. दररोज पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडर च्या दरात वाढ होते आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असताना देशात मात्र पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहे. याचाच निषेध अनोख्या पद्धतीने करण्यात आला.
हेही वाचा - आंदोलन झाल्याने कायदे रद्द होत नसतात - केंद्रीय कृषीमंत्री