नागपूर : राज्य विधिमंडळाच्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या (State Legislature winter session) दुसऱ्या दिवशी मंगळवारी, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे (यूबीटी) आमदार आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी विधानभवनातील काँग्रेस कार्यालयात एमव्हीए नेत्यांच्या बैठकीनंतर निदर्शने (MVA protests) केली. शिंदे सरकार भ्रष्ट असल्याचा आरोप (Shinde govt accused of corruption) करत मविआ नेत्यांनी घोषणाबाजी केली आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Winter Session 2022 : विरोधकांचा शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारमध्ये (MVA Govt) मंत्री असताना घेतलेल्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी (demands resignation of CM Shinde) करण्यात आली आहे.
![Winter Session 2022 : विरोधकांचा शिंदे सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी General Legislature Session Nagpur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17257810-thumbnail-3x2-shinde33.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जमिनीचे खासगी व्यक्तींना वाटप : झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या जमिनीचे खासगी व्यक्तींना वाटप करणे हा विशेष मुद्दा आहे. हायकोर्टाच्या खंडपीठाला १४ डिसेंबर रोजी अॅमिकस क्युरी अधिवक्ता आनंद परचुरे यांनी माहिती दिली की, शिंदे मविआ सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना NIT ला गृहनिर्माण योजनेसाठी संपादित केलेली जमीन देण्याचे निर्देश दिले होते.