महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Police Ordered To Women : पोलिसांचा भोंगळ कारभार; महिलांना दिले स्वातंत्र्यदिनी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - गणेशपेठ पोलिसांची चूक

पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्या 7 आंदोलनकर्त्या महिलांना नागपुरातील गणेशपेठ पोलिसांनी १५ ऑगस्ट म्हणजेच सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे सूचनापत्र पाठवले आहे. हे पत्र बघून त्या महिलासुद्धा आश्चर्यचकित झाल्या. पोलिसांना ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी ती चूक मान्य देखील केली.

Ganeshpeth Police Ordered Women
गणेशपेठ पोलीस ठाणे

By

Published : Aug 5, 2023, 8:52 PM IST

नागपूर:धरणे आंदोलन करणाऱ्या सात आंदोलनकर्त्या महिलांना नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी चक्क १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनी अर्थात सुट्टीच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे सूचनापत्र पाठवले आहे. विनापरवागी आंदोलन केल्याच्या गुन्ह्यात संबंधित महिलांवर दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे. पोलिसांनी स्वातंत्र्य दिनाच्या अर्थात सुट्टीच्या दिवशी कोर्टात हजर राहण्याचे सूचनापत्र पाठवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून ही चूक अनावधानाने झाली असून ती सुधारली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गणेशपेठ पोलिसांनी महिलांना पाठविलेला हाच तो नोटीस

पार्किंगच्या वादातून महिलेला मारहाण:राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या नूतन रेवतकर आणि इतर ६ महिलांना गणेशपेठ पोलीस ठाण्यामधून पोस्टाद्वारे हा समन्स प्राप्त झाला आहे. २९ मे २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या नूतन रेवतकर यांनी निदर्शने केली होती. पार्किंगच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपींच्या बचावासाठी स्थानिक भाजप नेत्यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर नूतन रेवतकर यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती.


स्वातंत्र्य दिनी दोषारोप दाखल करणार म्हणे:आता या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी नूतन रेवतकर यांच्यासह सात महिलांना समन्स पत्र पाठवून १५ ऑगस्ट रोजी दिवशी जिल्हा सत्र न्यायालयात महाराष्ट्र पोलीस कायदा, कलम १३५ अंतर्गत दोषारोप पत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. हा समन्स बघून महिला देखील गोंधळल्या असून त्यांनी पोलिसांना त्यांची ही चूक लक्षात आणून दिली आहे.


अनावधानाने चूक झाली:एखादे तातडीचे प्रकरण वगळता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सहसा न्यायालयात सुनावणी होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी कोर्टात हजर राहण्याचे समन्स पोलिसांनी पाठवल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण असल्याने १४ किंवा १६ ऑगस्ट या दिवशी हजर राहण्याची सूचना देणे शक्य होते. याप्रकरणी अनावधानाने ही चूक झाली असून यात दुरुस्ती करण्यात येणार अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा:

  1. नागपुरात शुल्लक कारणावरून दोघांनी केला मित्राचा खून; आरोपी फरार
  2. Nagpur Murder News : नागपूर पुन्हा हादरले! महिलेची दगडाने ठेचून हत्या; दोन दिवसात तीन घटना
  3. Nagpur Crime : बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याची लूट, दुचाकीसह पळवले 1 कोटी 15 लाख रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details