नागपूर- यंदा विदर्भात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे चांगल्या पावसासाठी बाप्पाला साकडे घातले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी म्हणाल्या. आज गडकरींच्या नागपुरातील निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्या बोलत होत्या.
गडकरींच्या घरी गणपतीचे आगमन, कांचन यांचे विदर्भात चांगल्या पावसासाठी बाप्पाला साकडे - कांचन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणपतीचे आगमन झाले आहे. यावेळी त्यांच्या अर्धांगिनी कांचन गडकरी यांच्यासोबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी यांनी केलेली चर्चा...
देशात गणेशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी सर्व गडकरी कुटुंबियांनी एकत्र बाप्पाची मनोभावे पूजा केली. तसेच नितीन गडकरी कामात कितीही व्यस्त असले, तरी गणेशोत्सवाच्या काळात ते बाप्पाची सेवा करण्यासाठी आवर्जून घरी उपस्थिती राहतात, असे कांचन यावेळी म्हणाल्या. गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपले संस्कार नव्या पिढीला हस्तांतरीत होत असल्याचा विशेष आनंद असल्याचे देखील कांचन यांनी सांगितले.