नागपूर -यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ बसणार आहे. यावर्षी साहित्य महागल्याने गणरायांच्या मूर्तींच्या किमतीवर परिणाम झाला असून 10 ते 20 टक्क्यांनी मूर्ती महाग झाल्याचे मूर्तीकार सांगत आहेत. महाराष्ट्राचे 'आराध्य दैवत' म्हणून मान्यता असलेल्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे वेध गणेश भक्तांसह अवघ्या महाराष्ट्राला लागले आहे. गणेशमंडळ सज्ज झाले असून सर्वसामान्य गणेशभक्त सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहेत.
नागपुरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ - गणपती बाप्पा मोरया
नागपुरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ बसणार आहे.साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा परिमाण मूर्तींच्या किमतीवर पडला असून यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे. बाप्पांची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 10 ते 20 टक्क्यांनी भाववाढ झाली आहे.
नागपूरात यंदाच्या गणेशोत्सवाला महागाईची झळ
भक्तांच्या उत्साहाला उधाण आले असताना यावर्षी बाप्पांच्या मूर्तींना महागाईची झळ बसलेली आहे. सामान्यत: 5 हजार रुपयाला मिळणाऱ्या मूर्तीकरता यावर्षी गणेशभक्तांना 7 हजार म्हणजेच 2 हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारी माती, लाकडी पाटी, तनस आणि रंगाचे भाव वाढले असल्याने मूर्तींच्या किमतीमध्ये 10 ते 20 टक्यांची वाढ झालेली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या सावटाखाली असल्याचे चित्र आहे.