नागपूर- लॉकडाऊनच्या काळात गोर गरिबांच्या हाताला काम नसल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानाचा सर्वात मोठा आधार आहे. सरकार या दुकानांच्या माध्यमातून गरिबांना धान्य वितरित करत आहे. मात्र, याचा फायदा घेत काही दुकानदार धान्याचा काळाबाजार करत असल्याचे समोर येत आहे.
स्वस्त धान्याचा काळाबाजार, पोलिसांनी लाखोंचे धान्य केले जप्त - नागपुरात स्वस्त धान्याचा काळाबाजार
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे अशाच एका काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सिल्लेवाडा येथे डी. एल. कळमकर यांच्या स्वस्त धान्य दुकानावर गुन्हे शाखा आणि तालूका पुरवठा अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यात दुकानदार दिलीप कळमकर यांनी गोदामात 50 किलोची 81 पोती धान्य लपवून ठेवले होते.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे अशाच एका काळाबाजार करणाऱ्या दुकानदाराच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सिल्लेवाडा येथे डी. एल. कळमकर यांच्या स्वस्त धान्य दुकानावर गुन्हे शाखा आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यात दुकानदार दिलीप कळमकर यांनी गोदामात 50 किलोची 81 पोती धान्य लपवून ठेवले होते. या 40.50 क्विंटल तांदळाची शासकीय दराने 12 हजार 150 एवढी किंमत आहे. पोलिसांनी याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकारे पोलिसांनी अनेक दुकानदारांवर कारवाई करत लाखोंचे धान्य जप्त केले आहे.