नागपूर:नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वन परिक्षेत्रातील (hingana Forest area) नेरी मानकर नियत वनक्षेत्रात एका नाल्यामध्ये वाघीण मृत अवस्थेत आढळून आली. (Tiger Death in hingana). मृत वाघीण ही तीन ते चार वर्षांची असल्याचा अंदाज आहे. हिंगणा वनपरिक्षेत्राचे कर्मचारी जंगलात गस्त घालत असताना उपक्षेत्र उमरी (वाघ) येथील चंकापुर नाल्यामध्ये या वाघीणीचे शव दिसून दिसून आले. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून आज शव विच्छेदन करण्यात आले आहे.
Tiger Death: चार वर्षांच्या वाघीणीचा हार्ट फेलने मृत्यू! - नाल्यामध्ये वाघीण मृत
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा वन परिक्षेत्रातील (hingana Forest area) नेरी मानकर नियत वनक्षेत्रात एका नाल्यामध्ये वाघीण मृत अवस्थेत आढळून आली. (Tiger Death in hingana). प्राथमिक माहिती नुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने झाला असल्याचे दिसून आले आहे.
tiger died due to heart failure
श्वसन क्रिया बंद पडल्याने वाघिणीचा मृत्यू: हिंगणा वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी एनटीसीए (NTCA) च्या मार्गदर्शक सूचनां नुसार कार्यवाही केली आहे. प्राथमिक माहिती नुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने झाला असल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिक तपासणी करीता नमुने घेण्यात आले असुन RFL नागपूर येथे हे नमुने पाठवण्यात आले आहेत.