मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात ; चार महिलांचा मृत्यू - ईसापुर - घुबडमेट रस्त्यावर अपघात
संत्र्याच्या बागेत संत्री तोडण्यासाठी महिला मजूरांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनला अपघात ( Bolero pickup van crashes ) झाला आहे. या भीषण अपघातात चार महिलांचा मृत्यू झाला आहे.
नागपूर : काटोल तालुक्यात ( Accident in Katol taluka ) बोलेरो पिकअप व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे. वाहन चालकांचे नियंत्रण सुटल्याने वाहन झाडावर जाऊन आदळल्याने हा अपघात झाला आहे. रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. मनीषा सलाम, मंजुळा उईके, कलाताई परतेती आणि मंजुला धुर्वे असे मृत्यू ( Four women died in the accident ) झालेल्या महिला मजुरांचे नाव आहेत. त्याचबरोबर इतर पाच महिला मजूर सुद्धा गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवारी पहाटे काटोल तालुक्यातील ईसापुर - घुबडमेट रस्त्यावर हा अपघात ( Isapur - Accident on Ghubadmet road ) झाला आहे. या परिसरातील सध्या संत्र्याच्या बागेत संत्री तोडण्याच्या काम सुरू आहे. त्यासाठी या महिला मजूर एका बोलेरो पिकअप व्हॅनने कामासाठी जात होत्या. तेव्हा हा अपघात घडला. काटोल येथून पहाटे चार वाजताच्या सुमारास बोलेरो वाहनचालकाचे नियंत्रण सुटले आणि बोलेरो रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. अपघातात इतका भीषण होता की. त्याच्यामध्ये तीन महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर एका महिलेला रुग्णालयात नेताना तिचा मृत्यू झाला आहे. इतर पाच जखमी महीलांवर रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरु आहेत.