नागपूर - घर कामाकासाठी, ऑफिस कामासाठी पगारी नोकर असतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा पगारी नोकरांची माहिती देणार आहोत जे ऐकुण तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पोलिसांनी चोराला अटक करणे काही नवीन नाही. मात्र नागपूर पोलिसांनी अशा चोराला अटक केली ज्याला चोरी करण्यासाठी पगाराशिवाय कमिशनही मिळायचे. पोलिसांनी चार आरोपींना अटक असून यात दोन आरोपी विधिसंघर्ष आहे. दरमहा दहा ते पंधरा हजार रुपये या पगारावंर या चोरट्यांना ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ऐकावं ते नवल : नागपुरात पगारी चोरट्यांना अटक, चोरीमागे कमिशनही मिळायचे - नागपूर पोलीस बातमी
पोलिसांनी चोराला अटक करणे काही नवीन नाही. मात्र नागपूर पोलिसांनी अशा चोराला अटक केली ज्याला चोरी करण्यासाठी पगाराशिवाय कमिशनही मिळायचे. पोलिसांनी चार आरोपींना अटक केले असून यात दोन आरोपी विधिसंघर्ष आहे.
नागपूर शहरातील बेलतरोडी पोलिसांनी आठवडी बाजारातुन मोबाइल चोरांच्या टोळीला सापळा रचून अटक केली आहे. या टोळीमध्ये बिहार आणि झारखंड राज्यातील प्रोफेशनल चोरट्यांचा समावेश आहे. ते नागपुरात टोळी बनवून वेगवेगळ्या बाजाराच्या ठिकाणी मोबाईल आणि पर्स चोरतात. त्यासाठी ते अल्पवयीन मुलांची मदत घेतात. शहरातील वेगवेगळ्या बाजारात काही दिवस चोरी केल्यानंतर ते त्यांच्या राज्यात निघून जातात. चोरट्यांचे राहण्याचे ठिकाण निश्चित नसल्याने त्यांना शोधणे कठीण होते. मात्र नागपूर पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या आंतरराज्यीय टोळीच्या चार सदस्यांना अटक केल्यानंतर आता मुख्य सुत्रधाराला सुद्धा अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सर्वात महत्वाचं म्हणजे ही टोळी आंतरराज्यीय आहे. या टोळीचे सूत्रसंचालन बिहार मधून होते. एवढेच नाही तर या टोळीला पगाराशिवाय चोरलेल्या मुद्देमाला वर कमिशन सुद्धा मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाईल जप्त केले आहेत. शेख सज्जू वल्द शेख रब्बूल (वय २३) आणि शेख शियाज वल्द शेख कासीम (वय २५) असे आरोपींचे नाव आहेत.