नागपूर- पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका तडीपार आरोपीसह दरोड्याचा तयारीत असणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. वाजीद शेख जीत उर्फ एक्का हा अटक करण्यात आलेल्या टोळीचा मोरक्या आहे. हिंगणा बायपास मार्गावरील पेट्रोल पंप लुटण्याचा तयारीत असताना पोलिसांनी चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना अटक, नागपूर पोलिसांची कारवाई
पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की काही आरोपी हिंगणा बायपास येथे अंधाराचा गैरफायदा घेऊन लपलेले आहेत. पोलिसांनी त्याठिकाणी जात चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एकाच्या कंबरेला मोठी लोखंडी टोकदार धारदार तलवार आढळून आली.
पोलिसांना माहिती मिळाली, की राजीव नगरात गुन्हेगारी प्रवृत्तीचा एक व्यक्ती कमरेला तलवार लावून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या बेतात आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी जात संबंधिताचा शोध घेतला, तेव्हा तो पोलिसांना सापडला नाही. तेव्हापासून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत होते. अशात पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की काही आरोपी हिंगणा बायपास येथे अंधाराचा गैरफायदा घेऊन लपलेले आहेत. पोलिसांनी त्याठिकाणी जात चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यापैकी एकाच्या कंबरेला मोठी लोखंडी टोकदार धारदार तलवार आढळून आली.
पोलिसांनी त्या इसमाची चौकशी सुरू केली असता, तो वाजीद शेख जीत उर्फ एक्का असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याची माहिती काढायला सुरुवात केली. यातून त्याला गेल्या वर्षीच तडीपार केले असल्याचे समोर झाले. वाजीद शेखने तडीपार असतानासुद्धा इतर साथीदारांसह राजीवनगर परीसरात वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापला होता. सोबतच परिसरामध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. मागील महिन्यात काही आरोपींनी हिंगणा बायपास पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा खून करून पैसे लुटले होते. त्याच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत हे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.