नागपूर Bribery Case Nagpur :नागपूरच्या लक्ष्मीनगर येथील प्रियदर्शन दिनकर देशपांडे आणि मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकलचे संचालक देवीसिंग कछावाह अशी काल अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. देवी सिंग चित्तोगड, राजस्थान येथील आहे. कारवाई दरम्यान १० लाख रुपयांची लाचेची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने काल सेमिनरी हिल्स येथील पेसो कार्यालयाजवळ टायपिंगच्या दुकानात सापळा रचला होता. त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. खासगी व्यक्ती प्रियदर्शन देशपांडे यांच्या घरातून सव्वा कोटी रुपये आणि एका अधिकाऱ्याच्या घरातून ९० लाख रुपये मिळाले आहेत. (CBI)
'या' कारणासाठी मागितली लाच:राजस्थानच्या चित्तोगडमध्ये असलेल्या स्फोटक कंपनीत इलेक्ट्रॉनिक डिटोनेटरची निर्मिती होते. डिटोनेटरची निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी पेसोच्या अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. अतिरिक्त डिटोनेटर्स निर्मितीची परवानगी देण्यासाठी १० लाखांची लाच घेतली जाणार आहे, अशी माहिती सीबीआयच्या पथकाला समजली होती. त्याआधारे 'पेसो'च्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधिक पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. लाच देणारा राजस्थानच्या कंपनीचा संचालक आणि एक बाहेरील व्यक्तीला देखील अटक करण्यात आली आहे.
मुख्यालय सहाय्यकाला लाच घेताना अटक: लाच घेताना अटक करण्यात आल्याची अशीच एक घटना धुळे शहरात 2021 मध्ये घडली होती. यामध्ये जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय चलन काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्यालय सहाय्यक सुनील वसंत धामणे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानुसार 6 एप्रिल, 2021 रोजी (मंगळवार) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत सुनील धामणे यांना 1 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले होते.
अशी झाली कारवाई: तक्रारदाराचे चिंचवार येथे स्वतःच्या मालकीचे शेत होते. त्यांना शेतीची हद्द मोजणी करायची असल्याने त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे अर्ज केला होता. जमिनीच्या मोजणीसाठी शासकीय चलन काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्यालय सहाय्यक सुनील वसंत धामणे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयाची लाचेची मागणी केली. त्यानुसार आज (मंगळवार) धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत सुनील धामणे यांना 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यामुळे शहरात खळबळ उडाली होती.
हेही वाचा:
- हिटलरच्या प्रचार यंत्रणेप्रमाणे भाजपाचं काम, शरद पवारांचा मोंदीवर हल्लाबोल
- जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी देशाची माफी मागावी, विश्व हिंदू परिषदेची मागणी
- लोकसभा निवडणुकीचे वाजू लागले पडघम, शिवसेना शिंदे गटाचं ६ जानेवारीपासून शिवसंकल्प अभियान