नागपूर-रविवारी दिवसभरात नागपुरात ४९ रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ हजार २८३ झाली आहे. तर ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे,त्यामुळे नागपुरातील कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १५०३ इतकी झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात रविवारी कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. महत्वाचे म्हणजे ३५ पैकी २२ जण नागपूरमधील असून १३ जिल्ह्याबाहेरील आहेत.अमरावती आणि अकोला येथील कोरोनाबाधितांचे मृत्यू नागपूरमध्ये झालेले आहेत,त्यामुळे नागपूरमध्ये होणारी एकूण मृत्युसंख्या ३७ एवढी झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी जास्त होत असल्याने धोका कमी झालेला नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे उपराजधानी नागपुरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
सध्या नागपुरातील ०७ ठिकाणी ७४५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(मेयो) १०० तर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडीकल)१४६, एम्स मध्ये ५०,कामठी येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये २८ आणि खासगी रुग्णालयात २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये २०६ आणि आमदार निवासामध्ये १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.