नागपूर- वाढीव वीज बिले येत्या दोन तीन दिवसात माफ न झाल्यास, वीज बिलांची होळी करत राज्य सरकारचा निषेध करण्यात येईल. असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाय एकही वीज जोडणी कापली तर भाजपकडून त्या ठिकाणी उभे राहून आंदोलन करण्यात येईल असेही बावनकुळे म्हणाले.
...अन्यथा राज्यभर वीज बिलाची होळी करू - चंद्रशेखर बावनकुळे - नागपूर वाढीव वीज बिले
वाढीव वीज बिलांचा विषयावरून वाद निर्माण झाला आहे. सरकारकडून वीज बिले माफ केली जाणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता पुन्हा या प्रश्नावर भाजपसह इतर पक्ष आंदोलन करत आहेत.
नागपूर
लॉकडाऊनच्या काळात आलेली अव्वाच्या-सव्वा वीज बिले तत्काळ माफ करा. ऊर्जामंत्री व राज्य सरकार जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे या सरकारविरोधात भाजपकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे, असेही माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे वीज बील थकबाकीवरून केंद्राकडे बोट दाखविण्यापेक्षा जनतेला बील माफ करून दिलासा द्या, अशी मागणीही यावेळी बावनकुळे यांनी केली.
Last Updated : Nov 20, 2020, 3:59 PM IST