नागपूर - माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या वाहनाच्या ताफ्यातील गाडीचा सोमवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात सुरक्षा ताफ्यातील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
माजी मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या वाहनांच्या ताफ्यातील कारचा अपघात, तिघे जखमी - प्रफुल पटेल यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात बातमी
माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या ताफ्यातील गाडीचा सोमवारी पहाटे अपघात झाला. या अपघातात सुरक्षा ताफ्यातील तिघेजण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
प्रफुल्ल पटेल हे भंडारा मार्गे नागपूरला येत असताना पहाटे 3 च्या सुमारास नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात कोडोली शिवारात सुरक्षा रक्षकांची कार व कंटेनरमध्ये अपघात झाला. या अपघातात 2 पोलीस कर्मचाऱ्यांसह १ सहायक पोलीस निरीक्षक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात होऊन ३ सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - काटोल विधानसभा: राष्ट्रवादीच्या देशमुखांना भाजपचे चरणसिंग ठाकूर देणार आव्हान?