महाराष्ट्र

maharashtra

Bharat Jodo Yatra माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेत जखमी

By

Published : Nov 2, 2022, 9:15 AM IST

माजी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत. भारत जोडो यात्रा हैदराबाद येथे असताना गर्दीत झालेल्या ( Bharat Jodo Yatra Hyderabad ) धावपळीत ते खाली पडले. त्यामुळे त्याच्या डोक्याला (कपाळाला) आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात ( Nitin Raut in Hyderabad ) उपचार सुरू आहेत.

नितीन राऊत
नितीन राऊत

नागपूर : माजी ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत भारत जोडो यात्रे दरम्यान जखमी झाले आहेत. भारत जोडो यात्रे दरम्यान गर्दीचा धक्का लागल्याने नितीन राऊत रस्त्यावर कोसळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली आहे. कार्यकर्त्यांनी त्यांना जवळील रूग्णालयात दाखल ( Nitin Raut injured in Bharat Jodo Yatra ) केले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.

माजी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत. भारत जोडो यात्रा हैदराबाद येथे असताना गर्दीत झालेल्या ( Bharat Jodo Yatra Hyderabad ) धावपळीत ते खाली पडले. त्यामुळे त्याच्या डोक्याला (कपाळाला) आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात ( Nitin Raut in Hyderabad ) उपचार सुरू आहेत.

भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात :काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ( Bharat Yatra Maharashtra visit ) नेतृत्वाखाली काश्मीर ते कन्याकुमारी निघालेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या यात्रेने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातून प्रावस पूर्ण केलेला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा 54 दिवसांपासून सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details